कोल्हापूरमधील आमदर ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण

दोनच दिवसांपूर्वी आमदार ऋतुराज पाटील यांनी "त्याला काय हुतंय " म्हणून दुर्लक्ष करू नका अशा आशयाची एक व्हिडिओ क्लिप सुद्धा आपल्या अधिकृत सोशल माध्यमांच्या अकाऊंटवर वर प्रसारित करून कोरोना पासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात  कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजकीय नेते ,वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी आणि सरकारी कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या विळख्यात येत आहेत.

अशातच नेहमी मतदारसंघातील आणि कोल्हापूरच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तत्पर असणारे आमदार ऋतुराज पाटील यांचा कोरोना तपासणीचा अहवाल  गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आला, त्यानंतर त्यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर आणि ट्विटरवर आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून उपचार सुरू असल्याचे आणि प्रकृती ठीक असल्याबाबत लिहिले आहे. 

दोनच दिवसांपूर्वी आमदार ऋतुराज पाटील यांनी “त्याला काय हुतंय ” म्हणून दुर्लक्ष करू नका अशा आशयाची एक व्हिडिओ क्लिप सुद्धा आपल्या अधिकृत सोशल माध्यमांच्या अकाऊंटवर वर प्रसारित करून कोरोना पासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

यामध्ये त्यांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. पण न घाबरता कोरोना महामारीला रोखण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेने धैर्याने सामोरे जावून लढा द्यावा. स्वतःसह आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे आवाहन जनतेला केले आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि हँड सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक .प्रशासन आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यालाही सहकार्य करावे. लक्षणे दिसल्यानंतर तात्काळ योग्य उपचार घ्यावेत असेही त्यांनी म्हटले आहे.