rupali patil

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची किणी टोल नाक्यावर राडा घातला. फास्ट टॅग वरून त्यांची टोलनाक्यावर वादावादी जाली. टोल नाक्यावर वाहनांच्या ५ ते ६ किमी लांब रांगा लागल्याने रुपाली पाटील ठोंबरे यांनी जाब विचारला यानंतर टोल नाक्यांवर मोठा गोंधळ पहायला मिळाला. रुपाली पाटील यांनी या प्रकाराचे फेसबुक लाईव्ह देखील केले होते.

    कोल्हापूर : मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची किणी टोल नाक्यावर राडा घातला. फास्ट टॅग वरून त्यांची टोलनाक्यावर वादावादी जाली. टोल नाक्यावर वाहनांच्या ५ ते ६ किमी लांब रांगा लागल्याने रुपाली पाटील ठोंबरे यांनी जाब विचारला यानंतर टोल नाक्यांवर मोठा गोंधळ पहायला मिळाला. रुपाली पाटील यांनी या प्रकाराचे फेसबुक लाईव्ह देखील केले होते.

    देशातील सर्वच टोन नाक्यांवर बुधवारी फास्टॅगला सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत मंगळवारी रात्री कोल्हापूरच्या किणी चोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यावेळी रुपाली पाटील किणी टोल नाक्यावरुन पुण्याच्या दिशेनं निघाल्या होत्या. मात्र, टोल नाक्यावर प्रचंड मोठी रांग लागली होती. त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी थोडी वादावादी झाल्याचंही पाहायला मिळालं. तेव्हा रुपाली पाटील यांच्या मदतीला टोल नाक्यावरील अन्य वाहन चालकही आल्याचं पाहायला मिळालं.

    रुपाली पाटील यांनी या प्रकाराचे फेसबुक लाईव्ह देखील केले. किणी टोल वर फास्ट टॅग वरून लोकांची पिळवणूक थांबवा. ७ किलोमीटर रांगा लाज वाटू द्या लोकांना सुविधा द्यायला आहात का मारायला? फास्ट टॅग नाही म्हणून डबल पैसे देणार नाही पहिल्या रांगा बंद करा पहिल्या. फास्ट टॅग करून वेळ वाचतच नाही काय उपयोग मग तुमचा फास्ट टॅग करून. हे सर्व थांबवा नाही तर मनसे आंदोलन करावे लागेल असा इशाराही रुपाली पाटील यांनी दिला.