सात वर्षांच्या बालिकेसह महिलेची वारणा नदीत उडी मारून आत्महत्या

    वारणानगर : येथील वारणा नदीवरील कोडोली – चिकुर्डे ता. पन्हाळा या धरण पुलावरून मंगळवारी (दि. २४) रात्री उशीरा आईने मुलीसह उडी घेऊन आत्महत्या केली असून, नदीपात्रात मुलीचा मृतदेह शोध घेण्याची मोहीम सुरू आहे.

    कोडोली ता. पन्हाळा येथील रेश्मा अमोल पारगावकर (वय ४३) असे या मृत आईचे नाव आहे. तिचा मृतदेह नदीपात्रात ऐतवडे खुर्व (ता. वाळवा) हद्दीत सकाळी सापडला असून, याबाबतची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली आहे. तर रूदा (वय अंदाजे वय ७) हिचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. बोटीच्या सहाय्याने तिच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.

    घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, फौजदार नरेद्र पाटील, कुरळप पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक जाधव व कर्मचारी तलाठी अनिल पोवार आपत्ती व्यवस्थेत मदत करणारे तरूण यांच्या संयुक्तपणे रुदा हिच्या मृतदेहाचा बोटीने शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.

    रेश्मा या रुदा मुलीसह रात्री उशीरा वारणा नदीवर आत्महत्या करायला गेल्या होत्या. तिथे असणाऱ्या मच्छीमार व अन्य एका तरुणाने सुमारे दोन तास त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून परत पाठवल्याचे समजते. त्यानंतर रात्री उशिरा तिने मुलीसह आत्महत्या केली.

    रेश्मा ही नवऱ्यापासून वेगळी रहात होती ती कोडोलीतील डॉ. गोडबोले यांच्या हॉस्पीटल येथे नोकरी करीत होती. मुलगी रुदा ही मतीमंद होती. त्यामुळे ती अस्वस्थ होती यातच आप्त नातलग लक्ष देत नाहीत. समाजातून देखील सहकार्य होत नाही. या कारणास्त्व तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.