खासदार धैर्यशील मानेंनी जाणून घेतल्या शिरोळ तालुक्यातील जनतेच्या अडचणी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी शिरोळ येथील जनसंपर्क कार्यालयांमध्ये उपस्थित राहून तालुक्यातील जनतेशी संवाद साधला. तालुक्यातील मुख्य प्रश्न जाणून घेऊन त्या समस्या निराकरण करण्यासाठी प्रशासनाला तातडीने आदेश देऊ असे सांगितले.

    जयसिंगपूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी शिरोळ येथील जनसंपर्क कार्यालयांमध्ये उपस्थित राहून तालुक्यातील जनतेशी संवाद साधला. तालुक्यातील मुख्य प्रश्न जाणून घेऊन त्या समस्या निराकरण करण्यासाठी प्रशासनाला तातडीने आदेश देऊ असे सांगितले.

    शिरोळ येथील जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीने संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना संपर्क करून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. पूरग्रस्त, शेतकरी व रस्ते प्रश्नांवर प्रामुख्याने चर्चा झाली. रस्त्यांच्या प्रश्नासाठी येत्या आठवड्यात बैठक लावून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन माने यांनी दिले.

    यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवीतके, उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, शिवसेना संघटिका रेखा जाधव, युवा सेना प्रतीक धनवडे, चंद्रकांत मोरे , जयसिंगपूर शहरप्रमुख तेजस कुराडे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अण्णासो बिल्लोरे, माजी नगराध्यक्ष शंकरराव कलगुटगी, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव,नगरसेवक सर्जेराव पवार, डॉ.सागर पाटील, विकास पाटील, राकेश खोंद्रे, अबिद पटेल, राहुल पाटील, संजय शिंदे, शिरोळ तालुक्यामधील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिरोळ तालुक्यातील शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.