मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा

सारथी सोडून इतर मागण्यांबाबत जास्त हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

    कोल्हापूर :  मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यानी हा इशारा दिला आहे.

    अजित पवार यांना दूरध्वनी करणार

    सारथी सोडून इतर मागण्यांबाबत जास्त हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. ते म्हणाले की, राज्य लोकसेवा आयोगाच्या २१८५ तरुणांच्या बाबतीत लवकर योग्य निर्णय घ्यावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा दूरध्वनी वरून विनंती करणार आहे. त्यानंतरही राज्य सरकारला जाग आली नाही तर मात्र पुन्हा मूक आंदोलनाला पर्याय राहणार नाही असे ते म्हणाले.