कोल्हापूर जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचं थैमान ; कोरोना नसलेल्या तिघांना म्युकर मायकोसिस

जिल्ह्यात कोरोना नसलेल्या तिघांना म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराने त्रस्त केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 56 जण म्युकर मायकोसिस बाधित आढळले आहेत. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 जणांनी म्युकर मायकोसिसवर मात केली आहे.

    कोरोना संसर्गानंतर राज्यात म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळू लागले आहेत. हा बुरशीजन्य आजार कोरोना उपचार आणि उपचारापश्चात आढळत आहे. मात्र, आता रोगप्रतिकारशक्ती कमी आणि अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तीमध्ये म्युकर मायकोसिस आढळून आले आहे.

    जिल्ह्यात कोरोना नसलेल्या तिघांना म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराने त्रस्त केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 56 जण म्युकर मायकोसिस बाधित आढळले आहेत. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 जणांनी म्युकर मायकोसिसवर मात केली आहे.

    41 जणांवर उपचार सुरू आहेत. 8 जणांवर म्युकर मायकोसिसची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. 28 ते 72 वयोगटातील हे रुग्ण आहेत.