कोरोनाकाळात निर्भिडपणे लढणारे कर्मचारी देवदूतच : मुरलीधर जाधव

    कोल्हापूर : गेले वर्षभर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग त्रस्त आहे. कोरोना विषाणू विरोधात आक्रमकपणे लढत आहे. प्रत्येकालाच स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी वाटत आहे. या लढाईत शासन, प्रशासन व नागरिकांसह आरोग्य कर्मचारी, आशासेविका, सफाई कामगार, पोलीस व पत्रकार ताकदीनिशी लढत असे शिवसेनेचे मुरलीधर जाधव यांनी सांगितले.

    कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने “माझे कुटुंब, माझी जबाबदारी”,”मी जबाबदार” तसेच “माझे गाव, माझी जबाबदारी” यांसारख्या असंख्य उपक्रमांद्वारे आपला महाराष्ट्र सुस्थित येत आहे. आपल्या महाराष्ट्राला न थांबता पुढे नेण्यासाठी व राज्याचे आरोग्य सुस्थित ठेवण्यासाठी अग्रभागी असणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स तसेच सफाई कामगार,लसीकरण केंद्रावरील कर्मचारी,पोलीस व पत्रकार बंधू-भगिनींचा मोलाचा वाटा आहे. या फ्रंटलाइन योध्यांच्या कार्याचे ऋण हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, त्यामुळे या सर्वांचा शिवसेनेला सदैव अभिमान आहे. अशा कठीण परिस्थितीत अग्रभागी राहून कोरोनाच्या संकटाला निर्भिडपणे सामोरे जात असलेले सर्वच फ्रंटलाइन योद्धे आमचे देवदूतच आहेत, शाहूवाडी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या उपस्थितीत फ्रंटलाइन योध्यांच्या सत्कार करण्यात आला.

    यावेळी उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी,तालुकाप्रमुख दत्ता पोवार,पं.स. सभापती विजय खोत,उपसभापती दिलीप पाटील, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सौ.दीप्ती कोळेकर, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे,महिला आघाडी तालुका संघटिका अलका भालेकर,उपतालुकाप्रमुख दिनकर लोहार,विभागप्रमुख बळीराम ठाणेकर,योगेश कुलकर्णी,विजय लाटकर यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी,आरोग्य कर्मचारी,आशा सेविका व फ्रंटलाईनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.