नारायण राणेंच्या भाष्यामुळे कोल्हापूरात उद्रेक : राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला ; पुणे, बेंगलोर महामार्ग रोखला

केंद्रीय मंत्री राणे यांनी सुरु केलेल्या जनआशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. या यात्रे दरम्यान राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. या वक्तव्याचे पडसाद मुंबई, नाशिक, कोकणासह कोल्हापूरात ही उमटले.

  कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ मुंबई बरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. ना. नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन, रास्ता रोको, महामार्ग रोको अशा आंदोलनातून शिवसैनिक संताप व्यक्त करीत आहेत.

  कोल्हापूर शहरात जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शिवसैनिक ऐतिहासिक बिंदू चौकात ना. नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यासाठी रस्त्यावर आले . माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. युवा सेनेच्या वतीने महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात रास्ता रोको करण्यात आले. तर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुणे, बेंगलोर,महामार्गावरील किणी टोल नाका येथे महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले यावेळी ना़.नारायण राणेंच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या . आज अचानक जिल्ह्यातील शिवसैनिक ना. नारायण राणे यांच्या बद्दल संताप व्यक्त करीत रस्त्यावर आल्याने पोलीस यंत्रणेची सर्व त्र
  तारांबळ उडाली आहे.

  कागलमध्ये शिवसेनेचे मोठे आंदोलन झाले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कागलच्या चौकात नारायण राणे यांचा पुतळा जाळण्यात आला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत बदनामीकारक वक्तव्ये केल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कागलच्या चौकात नारायण राणे यांचा पुतळा जाळण्यात आला आणि राणेंना अटक करण्याची मागणी केली.

  अटकेची मागणी
  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसैनिकांनी निषेध मोर्चा काढून लक्ष्मीपुरी येथील आईसाहेब महाराज चौकात राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध केला. राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसैनिकांनी लक्ष्मीपुरी पोलिसांकडे केली.

  केंद्रीय मंत्री राणे यांनी सुरु केलेल्या जनआशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. या यात्रे दरम्यान राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. या वक्तव्याचे पडसाद मुंबई, नाशिक, कोकणासह कोल्हापूरात ही उमटले. कोल्हापुरात शिवसैनिकांनी बिंदू चौक या ठिकाणी एकत्र येवून केंद्रीय मंत्री राणे यांच्या निषेधाचे फलक झळकावत घोषणा दिल्या. लक्ष्मीपुरी येथील आईसाहेब महाराज पुतळा या ठिकाणी राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

  यानंतर शिवसैनिकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याकडे आपला मोर्चा वळवला. राणे यांनी राजशिष्टाचाराचा भंग केला आहे. समाजामध्ये तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

  यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, विनोद खोत, सरदार टीप्पे, राजू सांगावकर, गीतांजली गायकवाड, बाळासाहेब नलवडे, शांताराम पाटील, दत्ता पाटील, दिलीप पाटील, विशाल देवकुळे उपस्थित होते