‘नवराष्ट्र’ महिला पुरस्कार जाहीर; डॉ. स्मिता माळी, डॉ. प्राची घुणके पुरस्काराचे मानकरी

  कोल्हापूर : महिला सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘नवभारत’ वृत्तपत्र समुहाचा ‘नवराष्ट्र महिला पुरस्कार जाहीर’ करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातून सामाजिक कार्यकत्या म्हणून डॉ. स्मिता नितीन माळी यांची निवड करण्यात आली. तर हुपरी येथील घुणके हॉस्पिटलचे डॉ. प्राची सयाजी घुणके या आदर्श रूग्णालय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

  हा पुरस्कार सोहळा 24 जुलै रोजी पुणे येथील रामदा हॉटेल येथे पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरीचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, ज्येष्ठ नेत्या सुनेत्रा पवार, गायत्री छाब्रिया, पलरेशा निलेश, जानवी धारीवाल, पुष्पक राज कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, तेजस्वीनी सातपुते, सोनाली घोडावत, केदार चितळ, कृष्णकुमार गोयल, खासदार डॉ. अमोल कोल्हे, डॉक्टर सुनंदा नवले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

  अनेक रुग्णांना जीवदान

  डॉ. स्मिता माळी यांनी वैद्यकीय सेवेत आणि सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. त्यांचे पती डॉ. नितीन माळी यांचे त्यांना सहकार्य मिळाले आहे.

         

  हुपरी येथील घुणके हॉस्पिटलचे डॉ. प्राची सयाजी घुणके या नामांकित डॉक्टर आहेत. कोविड काळात हुपरी येथे सेंटरची उभारणी करून अनेक रूग्णांना जीवदान दिले आहे. तर पती डॉ. सयाजी घुणके याचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे.