kolhapur ambabai
विद्युत रोषणाईमुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलले आहे

नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वाला सुरुवात होत आहे. साडेतीन शक्ती पिठापैकी महत्त्वाचे पूर्ण शक्ती पीठ असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सुद्धा पश्चित महाराष्ट्र देवस्थान समितीकडून नवरात्रोत्सव काळामध्ये संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने खबरदारीचे उपाय करण्यात आल्याची माहिती समितीचे सचिव विजय पोवार यांनी नवराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना दिली.

 • नऊ दिवस विविध रुपात बांधण्यात येणार पूजा
 • नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर विद्युत रोषणाईने असे खुलले आहे

कोल्हापूर : देशाबरोबर राज्यभरामध्ये सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत होत असल्याचे दिसून येते आहे. असे असले तरीही अद्याप राज्यसरकारने राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिलेली नाही. सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक आक्रमक बनून आंदोलने करत आहेत. अशातच आता सणासुदीचे दिवस जवळ येत असल्याने भाविक सुद्धा देव दर्शनासाठी आतुर झाले आहेत.

आज पासून नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वाला सुरुवात होत आहे. साडेतीन शक्ती पिठापैकी महत्त्वाचे पूर्ण शक्ती पीठ असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सुद्धा पश्चित महाराष्ट्र देवस्थान समितीकडून नवरात्रोत्सव काळामध्ये संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने खबरदारीचे उपाय करण्यात आल्याची माहिती समितीचे सचिव विजय पोवार यांनी नवराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना दिली.

kolhapur karveervasini
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर विद्युत रोषणाईने असे खुलले आहे

सचिव पोवार म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यभरातील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या नियमांचे पालन करुन कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी, श्रीपुजक, आणि मानकरी यांच्या उपस्थीतीत मंदिरातील पूजाअर्चेचे सोपस्कार व धार्मिक परंपरा जोपासली जाणार आहे.कोरोनाचा प्रभाव लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापनानेही संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्य मंदिराचे चारही दरवाजे बंद ठेवण्यात आले असून केवळ एका दरवाज्यातूनच मंदिराच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रवेशद्वाराजवळ सॅनीटायझर, थर्मल स्कॅनर यंत्रणा बसवण्यात आली आहे.त्याचबरोबर ऑक्सीमीटर,आवश्यक औषधे आणि आरोग्य साहित्य मंदिरात उपलब्ध करण्यात आले आहेत.

karveer nivasini
देवीच्या गाभाऱ्यापर्यंत विविध रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे

karveer nivasini kolhapur

उत्सव काळात १० दिवस दररोज संपुर्ण मंदिर आणि परिसर सॅनिटराईझ (र्निंजंतुकीकरण) करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी ५०, सुरक्षेसाठी ५० कर्मचारी मंदिरात दररोज तैनात असणार आहेत. त्याचबरोबर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिराच्या चारी प्रवेशद्वारावर विनाकारण गर्दी करून कोरोनाचा प्रभाव वाढेल असे कृत्य करू नये असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे.नवरात्रीच्या काळात पोलीस प्रशासनाने सुद्धा या परिसरात बंदोबस्त तैनात केल्याचे सांगितले.कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे आणि महापौर निलोफर आजरेकर यांनीही नागरिकांनी नवरात्रीच्या काळात मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी करू नये, देवस्थान समितीने ऑनलाइन दर्शनासाठी सुविधा उपलब्ध केली असून भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

kolhapur ambabai
विद्युत रोषणाईमुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलले आहे

 

नऊ दिवस विविध रुपात बांधण्यात येणार पूजा

दिनांक १७ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या नऊ दिवस विविध रुपातील बांधण्यात येणाऱ्या पुजा आणि या नऊ दिवसात देवीला नेसवण्यात येणाऱ्या साड्यांचे रंग खालील प्रमाणे असतील

 • १७/१०/२०२० : शनिवार-घटस्थापना कुण्डलिनी स्वरुपात
 • १८/१०/२०२० : रविवार- द्वितीया पराशरकृत सर्वसंशयहर श्रीमहालक्ष्म्यष्टक
 • १९/१०/२०२० : सोमवार- तृतीया नागकृत महालक्ष्मी स्तवन
 • २०/१०/२०२० : मंगळवार-चतुर्थी सनत्कुमार महालक्ष्मी सहस्त्रनाम
 • २१/१०/२०२० : बुधवार-पंचमी गजारुढ अंबारीतील पूजा
 • २२/१०/२०२० : गुरुवार- षष्ठी श्रीशिवकृत महालक्ष्मी स्तुती
 • २३/१०/२०२० : शुक्रवार- सप्तमी अगस्त्यकृत सरस्वती स्तवन
 • २४/१०/२०२० : शनिवार-अष्टमी महिषासुरमर्दिनी
 • २५/१०/२०२० : रविवार- दसरा अश्वारुढ

साडी रंग

 • १७/१०/२०२० लाल
 • १८/१०/२०२० : पितांबरी
 • १९/१०/२०२० : केशरी
 • २०/१०/२०२० : निळा / जांभळा
 • २१/१०/२०२० : लाल
 • २२/१०/२०२० : पांढरा सोनेरी काट
 • २३/१०/२०२० : पिवळा / लिंबू
 • २४/१०/२०२० : लाल
 • २५/१०/२०२० : कोणत्याही रंगाची

अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष मा.महेश जाधव, सदस्य, सचिव, श्री पूजक माधव मुनिश्वर व हक्कदार श्री पूजक मंडळ यांनी प्रसिद्धी करीता दिली आहे