आठ महिन्यांपूर्वी केला विवाह नंतर आत्महत्या करून संपविले जीवन

    वारणानगर : संसाराला लग्नगाठ बांधून आठ महिन्यांपूर्वी सुरूवात केलेल्या वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील तरूण नवविवाहितेने राहत्या घरी गुरुवार (दि. २६) आत्महत्या केली. सई प्रसन्न भंडारी (वय २१) असे तिचे नाव आहे.

    सई हिला उपचारासाठी कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. आठ महिन्यांपूर्वीच तिचे वाडी रत्नागिरी येथील प्रसन्न भंडारी यांच्याबरोबर विवाह झाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेन करण्यात आले. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली असून, तपास कोडोली पोलीस करीत आहेत.