chandrakant patil

राज्यात गेल्या काही महिन्यात दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले. आता लवकरच तिसरी विकेट पडेल असे भाकित भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा केले. तिसरी विकेट आता कुणीही थांबवू शकत नाही. आरोप झाल्यानंतर आत्तार्पंत त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता, पण संपूर्ण बदनामी होईपर्यंत, न्यायालय फटकारेपर्यंत राजीनामा द्यायचा नाही, अशी सवय त्यांना लागली असल्याचा टोलाही पाटील यांनी मारला.

    कोल्हापूर : राज्यात गेल्या काही महिन्यात दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले. आता लवकरच तिसरी विकेट पडेल असे भाकित भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा केले. तिसरी विकेट आता कुणीही थांबवू शकत नाही. आरोप झाल्यानंतर आत्तार्पंत त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता, पण संपूर्ण बदनामी होईपर्यंत, न्यायालय फटकारेपर्यंत राजीनामा द्यायचा नाही, अशी सवय त्यांना लागली असल्याचा टोलाही पाटील यांनी मारला.

    मुलाची हौस भागवायला पैसे

    मुंबईत सुशोभिकरणाच्या नावाखाली पैसे उडवायला, मुलाची हौस भागवायला मुख्यमंत्र्यांकडे पैसे आहेत, आमदार निधीत वाढ करायला पैसे आहेत, मग हातावरचे पोट असलेल्या लोकांना पॅकेज द्यायला पैसे नाहीत का, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. सद्यस्थितीत लॉकडाऊन आवश्यक आहे, पण सर्वसामान्य घटक असलेल्या पन्नास लाख लोकांना तीन हजार कोटींचे पॅकेज दिल्याशिवाय तो जाहीर करायला आमचा विरोध राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

    राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. ही रुग्णवाढ रोखण्यासाठी कडक निर्बंध, लॉकडाऊन करणे आवश्यक वाटत आहे. पण, घाईघाईने याबाबत निर्णय घेतल्यास त्याचा फटका समाजातील अनेक घटकांना बसणार आहे. यामुळे प्रथम लॉकडाऊनचा फटका ज्यांना ज्यांना बसू शकतो, त्या सर्वांना पॅकेज देणे आवश्यक आहे. पैसे नाहीत म्हणत रडगाणे गाण्याची ही वेळ नाही असेही पाटील म्हणाले.

    हा लोकशाहीचा खून!

    पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करून महाविकास आघाडी सरकारने राज्यात लोकशाहीचा खून केला असा आरोप करत आमदार पाटील म्हणाले, या मनमानी कारभाराविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा मोठ्या मतांच्या फरकाने विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.