शिरोळ तालुक्यातील गौरवाड येथे पोटावर वार करून एकाची आत्महत्या

    शिरोळ : गौरवाड (ता शिरोळ) येथील प्रकाश नेमिनाथ कोले यांनी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी स्वतःच्या पोटावर व पायावर चाकूने वार करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

    याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील प्रकाश कोले हे जयसिंगपूर येथील एका कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. उपचार घेऊन घरी आले होते. घरातील खोलीत त्यांनी सायंकाळच्या सुमारास पायावर व पोटावर वार करून घेऊन आत्महत्या केल्याची त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आली. तद्नंतर त्यांना तातडीने सांगली सिव्हिल येथे नेण्यात आले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    या मृतदेहाचे मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, नैराशेतून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती समजते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार  आहे.