kolhapur remdesivir black market

रेमडेसिवीर इंजेक्शनचा  काळाबाजार(remdesivir injection black market in kolhapur) करत असलेल्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरसह दोन तरुणांच्या मुसक्या कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी आवळल्या आहेत.

    कोल्हापूर: कोरोनाचे (corona)थैमान सुरू आहे.रुग्णांना दिलासा देणारे रेमडेसिवीर इंजेक्शन(remdesivir) मिळत नसल्याने नातेवाईक त्रस्त आहेत.या परिस्थितीचा गैरफायदा घेत कोल्हापुरात १८ हजार रुपये किमतीने एका रेमडेसिवीर इंजेकशनची विक्री केली गेली आहे. हा इंजेक्शनचा  काळाबाजार(remdesivir injection black market in kolhapur) करत असलेल्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरसह दोन तरुणांच्या मुसक्या कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी आवळल्या आहेत.

    संशयित योगीराज वाघमारे (वय २४)  आणि पराग पाटील (वय २६) अशी या दोन भामट्यांची नावे आहेत.यापैकी योगीराज वाघमारे हा प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहे.या दोघांकडून १ लाख ९८ हजार किंमतीच्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या ११ बाटल्या जप्त करण्यात पोलिसांना यश आले असल्याची  माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकारांना दिली.

    ते म्हणाले,पराग पाटील हा एका औषध दुकानात कामाला आहे. तो गैरमार्गाने अशा औषधाच्या बाटल्या परस्पर बाहेर काढून काळ्या बाजाराने विक्री करण्यासाठी योगीराज वाघमारेकडे देत होता. योगीराज हा त्या इंजेक्शनवर असलेल्या किमतीपेक्षा अथवा शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त रक्कम घेवून गरजूंना या इंजेक्शनची विक्री करत होता असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

    औषध निरीक्षक स्वप्ना सुरेश घुणकीकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहुपूरी पोलीस ठाण्यात या दोन्ही तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी मोठे रॅकेट आहे का याचा शोध आम्ही घेत आहोत अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.