कोल्हापूर-दौंड- मनमाड शेतकऱ्यांसाठी खास पार्सल ट्रेनचे संचालन

मध्य रेल्वेने कोल्हापुर / दौंड - मनमाड येथून विशेष किसान पार्सल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला असून ही गाड़ी क्रमांक ००१०७/००१०८ देवळाली –ते मुजफ्फरपुर- देवळाली किसान पार्सल ट्रेन लिंक करण्यात येइल.

कोल्हापूर : मध्य रेल्वेने कोल्हापुर / दौंड – मनमाड  येथून  विशेष किसान पार्सल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला असून ही गाड़ी क्रमांक ००१०७/००१०८  देवळाली –ते  मुजफ्फरपुर- देवळाली किसान पार्सल ट्रेन लिंक करण्यात येइल. 

तपशील खालीलप्रमाणे

गाड़ी क्रमांक ००१०९ डाऊन कोल्हापुर -मनमाड लिंक विशेष किसान पार्सल ट्रेन कोल्हापुरहून  दिनांक – २१.०८.२०२० ते दिनांक २५.०९.२०२० पर्यंत प्रत्येक शुक्रवारला सकाळी ०५.३० वाजता सुटेल  आणि  त्याच दिवशी १८.२५  वाजता मनमाडला पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ००११० अप मनमाड-कोल्हापुर  लिंक विशेष किसान पार्सल  ट्रेन मनमाडहून दिनांक – २४.०८.२०२० ते दिनांक २८.०९.२०२० पर्यंत प्रत्येक सोमवार ला ०८.०० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी कोल्हापुर ला ०८.३० वाजता पोहोचेल.

* थांबे: मिरज, सांगोला,पंढरपुर,कुर्दुवाडी,दौंड,अहमदनगर  आणि मनमाड नंतर देवळाली मुजफ्फरपुर-  किसान पार्सल गाडीचे थांबे असतील   

*सरंचना – कोल्हापुरहुन ५ व्हीपीयू आणि १ लगेज कम गार्ड ब्रेक, आणि दौंड हुन २ व्हीपीयू  , ही सर्व व्हीपीयू गाड़ी क्रमांक ००१०७/००१०८  देवळाली –ते  मुजफ्फरपुर- देवळाली किसान पार्सल गाडाला मनमाड येथे जोडली जाईल व काढली जाईल.

 ज्या शेतकरी ,कार्गो एग्री ग्रेटर , व्यापारी ,बाजार समिती , आणि लोडर्स ,  याना आपल्या जवळपासच्या स्टेशन   मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कडे संपर्क करावा लागेल.  रेल्वे प्रशासन शेतकऱ्यांना आवाहन  करते की जास्तीत जास्त पणे  या गाडीचा उपयोग घ्यावा .