Partial body of a woman found in a plastic bag in Kolhapur

राजाराम तलावाजवळ प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा अर्धवट मृतदेह सापडल्याने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. अ‌ॅसिड टाकून मतृदेह जाळण्याचा प्रयत्न झाल्याने मृतदेहाची ओळख पटवने पोलिसांना अवघड झाले आहे.

    कोल्हापूर : राजाराम तलावाजवळ प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा अर्धवट मृतदेह सापडल्याने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. अ‌ॅसिड टाकून मतृदेह जाळण्याचा प्रयत्न झाल्याने मृतदेहाची ओळख पटवने पोलिसांना अवघड झाले आहे.

    राजाराम तलावाच्या परिसरात काही नागरिक सकाळी फिरायला गेले असताना त्यांना तलावात प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आला. नागरिकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधत या प्रकाराची माहिती दिली.

    पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. केल्यानंतर मृतदेह अ‌ॅसिड टाकून जाळण्याचाही प्रयत्न केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृत महिलेची ओळख पटलेली नसून मृतदेह शवविच्छेदनसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगीतले.