आरारा खतरनाक ! पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पाहावेत. छातीत कळ आल्यास…कोल्हापूरातील पेट्रोल पंपावरचा इशारा बघून तुम्हालाही वाटेल नाद करायचा पण कोल्हापूरकरांचा नाही

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. दरदिवशी इंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. विविध संघटना, पक्ष या दरवाढीविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र दरवाढीने जास्त हैराण आहे तो सर्वसामान्य ग्राहक

    कोल्हापूर : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. दरदिवशी इंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. विविध संघटना, पक्ष या दरवाढीविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र दरवाढीने जास्त हैराण आहे तो सर्वसामान्य ग्राहक. कोल्हापुरातील एका पेट्रोल पंपावर दरवाढीच्या हैराणीचा असाच एक प्रकार पाहायला मिळाला. ‘पेट्रोलचे दर स्वतःच्या जबाबदारीवर पाहावेत. छातीत कळ आली तर पंप चालक जबाबदार राहणार नाही. – पेट्रोल पंप संघटना,’ अशी खोचक कोल्हापुरी टिप्पणी सरकत्या इलेक्ट्रॉनिक फलकावर लावण्यात आली आहे.सध्या समाज माध्यमात हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

    पेट्रोलने शंभरी गाठली आहे. इंधनाच्या दरवाढी विरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवला आहे. सर्वसामान्य जनताही समाजमाध्यमातून रोष व्यक्त करत आहेत.आता हे लोण थेट पेट्रोल पंप पर्यंतही पोहोचले आहेत.कोल्हापुरातील कोरगांवकर पेट्रोल पंपाने खास कोल्हापुरी स्टाईलचा फलक लावत दरवाढीवर खोचक आवाहन केले आहे. पंपावरचा हा मजेशीर मजकूर ग्राहकांनी समाज माध्यमात खूप वायरल केला. त्यावर रंगतदार शेरेबाजीचा पाऊस सध्या पडत आहे.

    पंप चालकांनी ‘हा प्रकार नव्याने सेवेत रुजू झालेल्या कामगाराकडून झाला आहे. आम्ही तो काढून टाकला आहे,’ असं नमूद केलं आहे.