राज्य सरकारचं बारावं घालायला आलेल्या सकल मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)स्थगितीला १२ दिवस होऊनही राज्य सरकार (Maharashtra State Government)पावलं उचलायला तयार नाही,त्यामुळे राज्य सरकारचं बारावं घालायला निघालेल्या सकल मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले.

सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती देऊन १२ दिवस झाले.तरीही राज्य सरकार कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही.अशातच राज्यात १२ हजार पोलिसांची पदे भरण्याचेही गृह मंत्र्यांनी जाहीर केले.आरक्षणाच्या स्थगिती मूळे मराठा तरुणांचे मोठे नुकसान होणार आहे.तर विद्यार्थ्यांना सुद्धा मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे त्यांचे नुकसान होणार आहे.त्यामुळे आज कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने राज्य सरकारचं बारावं अर्थात दशक्रिया विधी घालायला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता.

सरकारचं बारावं घालण्यासाठी सरकार विरोधात घोषणाबाजी करत पुढे सरसावलेल्या सकल मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.या आंदोलनाचे नेतृत्व सचिन तोडकर आणि दिलीप पाटील यांनी केले.मोठ्या संख्येने सकल मराठा कार्यकर्ते उपस्थित होते.