प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

विनाकारण शहरातून फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी आता थेट वाहनंच जप्त करायला सुरुवात केलीय. कोल्हापूर पोलीस हे नेहमीच  त्यांच्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखले जातात. दंड आकारून किंवा दंडुके उगारून कोल्हापूरकर ऐकत नाहीत, हे दिसल्यानंतर आता थेट वाहनंच जप्त करायला सुरुवात झालीय. त्यामुळे कोल्हापुरात विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत बसली असून याचा परिणाम रस्त्यावर दिसायलाही सुरुवात झालीय.

    देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. देशात दररोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा आता ३ लाखांच्याही वर  पोहोचलाय. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत असून १ मे पर्यंत राज्यात संचारबंदीची घोषणा करण्यात आलीय. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर असून विविध भागातले पोलीस विनाकारण फिरणाऱ्यांवर चाप बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोल्हापूर पोलिसांनी यासाठी एक अनोखी शक्कल लढवलीय.

    विनाकारण शहरातून फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी आता थेट वाहनंच जप्त करायला सुरुवात केलीय. कोल्हापूर पोलीस हे नेहमीच  त्यांच्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखले जातात. दंड आकारून किंवा दंडुके उगारून कोल्हापूरकर ऐकत नाहीत, हे दिसल्यानंतर आता थेट वाहनंच जप्त करायला सुरुवात झालीय. त्यामुळे कोल्हापुरात विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत बसली असून याचा परिणाम रस्त्यावर दिसायलाही सुरुवात झालीय.

    अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनानं नागरिकांना दिल्या आहेत.  मात्र अनेक नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्यामुळे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेवर याचा परिणाम होतोय. अशा बेजबाबदार नागरिकांमुळे गर्दी वाढत असून राज्यात संचारबंदी करण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो. एकदा वाहन जप्त झाल्यानंतर बाहेर फिरण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे पोलिसांनी ही शक्कल लढवलीय.

    मंगळवारी कोल्हापुरात १४६ वाहनं जप्त करण्यात आलीयत. तर नियम मोडणाऱ्यांकडून ४ लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. गस्तीपथकं आणि नाकेबंदी यांच्या मदतीनं विनाकारण फिरणाऱ्यांवर चाप आवळायला पोलिसांनी सुरुवात केलीय.