कोल्हापूर, सांगलीत पूर येण्याची शक्यता, ‘या’ ती धरणांतून पाण्याचा विसर्ग

पश्चिम महाराष्ट्रात पावसाची संत धार तसेच काही भागांत मुसळधार पाऊसाची हजेरी कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यांतील नदी, नाले, ओढे पुर्ण क्षमतेने वाहत आहेत. यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर, चांदोली आणि कोयना धरणातील दरवाजे २ ते अडीच फुटांनी उघडण्यात आले आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीमध्ये पुन्हा महापूर येण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील वर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पंचगंगा आणि कृष्णा नदीने धारण केलेल्या रौद्ररुपामुळे पुराच्या विळख्यात होता. आताही पश्चिम महाराष्ट्रात सतत बरसत असलेल्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसेच कोल्हापूर सांगलीतील चांदोली धरण आणि साताऱ्यातील कोयना धरणातील पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे दोन्ही धरणांचे काही दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा पूर स्थिती निर्माण होणार असल्याचे शंका उद्भवली आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात पावसाची संत धार तसेच काही भागांत मुसळधार पाऊसाची हजेरी कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यांतील नदी, नाले, ओढे पूर्ण क्षमतेने वाहत आहेत. यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर, चांदोली आणि कोयना धरणातील दरवाजे २ ते अडीच फुटांनी उघडण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. 

कोयना धरणामधील पाणीसाठी ९० टीएमसी आहे. तसेच आता धरणात ६० क्युसेकने पाण्याची आवक आहे. त्यामुळे धरणातून २५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे. तसेच पुढील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग केल्यामुळे कृष्णा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.