…म्हणून पोस्ट सुविधा होतीये फास्ट

पोस्ट खात्यामध्ये काम करत असताना गल्लीबोळातून सायकलीवरून फिरावे लागते. त्यामुळे अगदी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक व्यक्ती पोस्टमन दुपारी बाराच्या सुमारास येत असल्याचे माहित असल्याने पोस्टमन मामा अशी ओळख झाली.

  कोल्हापूर : भारतीय टपाल खात्याने (Post Department) खेड्यापासून, शहरापर्यंत नात्याचा धागा घट्ट विणण्याचे काम चांगल्याप्रकारे केले असून, बदलत्या युगात आजही पोस्टावर लोकांचा नितांत विश्वास असल्याने भारतीय पोस्ट सेवा आजही फास्ट प्रमाणात सुरू आहे. यामागे उत्कृष्ट व्यवस्थापन हेच याचे गमक आहे, अशा शब्दात वरिष्ठ अधिकारी, पोस्टमन तसेच सामान्य नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
  पुराणकाळात नारद मुनी, इतिहासात बहिर्जी नाईक, तर राजे महाराजांनी आपला संदेश पाठवण्यासाठी विविध प्रकारचा अवलंब केला. राजे महाराजांनी टपाल व्यवस्था म्हणून कबुतराचा वापर केला. आजही कबूतर जा.जा..जा…असा संदेश अनेकांच्या तोंडून आपणास ऐकावयास मिळतो, संस्थानाची स्वतःची अशी संदेश पाठवण्याची ही एक प्रकारची पोस्टाची यंत्रणा त्याकाळी कार्यरत होती.
  देशामध्ये आधुनिक टपाल सेवा ही १ ऑक्टोंबर १९५४ झाली असे सांगण्यात येते. त्यानंतर ही टपाल सेवा विविध माध्यमासाठी एक प्रमुख साधन बनून गेले, आजही टपाल व्यवस्थेकडे कोट्यावधी लोकांचा विश्वास संपादित झाला आहे. सुमारी पावणे दोनशे वर्षांचा कार्यकाल टपाल सेवेला लाभला आहे. टपाल सेवेच्या या देदीप्यमान इतिहासाकडे डोकावले असता; अनेक विविध पैलू आपणास पहावयास मिळतात. टपाल सेवेबाबत मध्यंतरीच्या काही काळात गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला होता, तरीसुद्धा टपाल सेवेचा कारभार आणि कार्यवाह चालवणारी यंत्रणेच्या लोकांनी गाव खेड्यापासून ते अति दुर्गम भागापर्यंत आपले नाते जोडून ठेवले आहे. ई-मेलच्या जमान्यातही टपाल सेवेचा हा वापर आजही मोठ्या प्रमाणात होत आहे .नोटिसी पासून विमा कंपनीच्या पावत्या, बँकांचे एटीएम कार्ड ,कोर्टाच्या नोटिसा, नोकरीसाठी नियुक्ती पत्र, शुभ संदेश पोचवण्याचे काम आज टपालसेवा करत आहे.
  बदलत्या काळात  टपाल खात्याने आज उतुंग भरारी घेतलेली आहे. खाजगी कुरियर सेवा जिथे नाकारली जाते, तिथे टपाल सेवेच्या माध्यमातून ही सेवा पोहच होते. आज स्पीड पोस्ट यामुळे एखाद्या नागरिकाने टाकलेले असलेले आपले टपाल ट्रेकिंग व्यवस्थेमुळे संबंधित नागरिकांना एस एम एस द्वारे टपालाची माहिती मिळू शकते ,यामध्ये आपले टपाल कधी टाकले, सध्या टपाल कोठे पोहोचले आहे, संबंधित आपल्या पोस्ट कार्यालयात टपाल आले आहे का, याबाबतची माहिती पटकन संबंधितांना आज मिळत आहे.
  नागरिकांच्या दारापर्यंत टपाल सेवा पुरवणारी भारतीय टपाल सेवा ही जगभरातील एकमेव सेवा म्हणून आज याकडे पाहिले जाते. त्यामुळेच ई-मेलच्या काळातही आज ही पोस्ट सेवा  ग्रामीण भागातील नागरिकांना थेट नावाने ओळखतात. अगदी गल्लीबोळात पासून मोठ्या आपार्र्टमेंट मध्येही पोस्टमन मामाची ओळख आज लोकांना झाली आहे.
  पोस्टमन मामावर लहानांपासून थोरांपर्यंत विश्वास
  पोस्ट खात्यामध्ये काम करत असताना गल्लीबोळातून सायकलीवरून फिरावे लागते. त्यामुळे अगदी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक व्यक्ती पोस्टमन दुपारी बाराच्या सुमारास येत असल्याचे माहित असल्याने पोस्टमन मामा अशी ओळख झाली. आजही टपाल घराघरात  देत असताना प्रत्यक्ष आपले नाव न घेता पोस्टमन मामाची ब्रीजावल्ली आपणास लागली आहे, असे आवर्जून यांनी यावेळी सांगितले.