Power change in Kolhapur's Gokul Dudh Sangh after 30 years: Guardian Minister Satej Patil's panel wins 17 candidates, Mandlik group shocked

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. सतेज पाटील यांच्या गटाने सत्ताधारी महाडिक गटाला जोरदार हादरा देत, गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणले आहे. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या गटाने केलेल्या एकत्र कामगिरीचा फटका महाडिक गटाला बसला आहे.

    कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. सतेज पाटील यांच्या गटाने सत्ताधारी महाडिक गटाला जोरदार हादरा देत, गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणले आहे. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या गटाने केलेल्या एकत्र कामगिरीचा फटका महाडिक गटाला बसला आहे.

    सतेज पाटील यांच्या गटाला १७ तर महाडिक गटाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक हे एकत्र आले होते. त्यांच्यासमोर सत्ताधारी माजी आमदार महादेवराव मंडलिक, माजी खासदार-भाजपा नेते धनंजय मंडलिक आणि आमदार पी एन पाटील यांचे गट आमनेसामने आले होते.

    कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक महासंघासाठी २ मे रोजी मतदान पार पडले होते. दोन्ही गटात असलेल्या चुरशीमुळे कोरोनाच्या काळातही सुमारे ९८ टक्के मतदान झाले होते. सत्ताधारी महाडिक दगटाकडून शाहू पॅनेल तर सतेज पाटील गटाकडून शाहू शेतकरी पॅनेल रिंगणात होते, यात अखेरीस सतेज पाटील यांच्या गटाने विजय मिळवला आहे. गोकुळ दूध संघातील २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी ३६५० पात्र सभासद होते, त्यातील तिघांचा दुर्देवाने मृत्यू झाला होता.

    या विजयामुळे सुमारे ३० वर्षांनंतर गोकुळ दूध संघामध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जाते. या दूधसंघाच्या निवडणुकीमुळे गेले काही महिने जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघाले होते. या सत्तातराने आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव मंडलिक यांची गोकुळमधील सत्ता संपुष्टात आली आहे.