पारगावच्या प्रज्ञा काकडे-जाधव यांची तहसीलदारपदी निवड

प्रज्ञा काकडे-जाधव यांचे मूळगाव सासवड, पुणे असून, येथील जुने पारगावच्या त्या स्नुषा आहेत. राज्यसेवा सुधारित निकालामध्ये तहसीलदार संवर्गात मुलींमध्ये त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे.

    हुपरी : पारगाव (ता. हातकणंगले) येथील व सध्या श्रीवर्धनच्या नायब तहसीलदार प्रज्ञा पद्माकर काकडे-जाधव (Pradnya Kakade Jadhav) यांची राज्यसेवा सुधारीत निकालांतर्गत तहसीलदारपदी निवड झाली. त्यांच्या या निवडीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

    प्रज्ञा काकडे-जाधव यांचे मूळगाव सासवड, पुणे असून, येथील जुने पारगावच्या त्या स्नुषा आहेत. राज्यसेवा सुधारित निकालामध्ये तहसीलदार संवर्गात मुलींमध्ये त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे.

    सध्या त्या श्रीवर्धनच्या निवासी नायब तहसीलदारपदी कार्यरत आहेत. त्या बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स) आहेत. त्यांचे सर्व शिक्षण पुण्यात झाले असून, त्यांचे पती सध्या मंत्रालयात कार्यरत आहेत.