maratha reservation

कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या(maratha reservation) अंमलबजावणीला स्थगिती(stay) देण्याचा आदेश केल्याने सकल मराठा समाजावर(maratha community) घोर अन्याय झाला आहे. या संपूर्ण गोष्टीला राज्य सरकार जबाबदार आहे. मराठा समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरातून पुण्या मुंबईला जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या दूध पुरवठ्याला गनिमी काव्याने रोखण्याचा इशारा आज सकल मराठा समाजाच्या वतीने सचिन तोडकर(sachin todkar) यांनी दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध दूध संघातून पुण्या-मुंबईला लाखो लिटर दूध पुरवठा केला जातो. मात्र यापुढे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पुण्या- मुंबईला जाणारी दूध वाहतूक गनिमी कावा पद्धतीने पद्धतीने रोखून मराठा समाजाचा हा आक्रोश राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई पुण्यातील नागरिक समंजस आहेत, मराठा समाजावर होणारा अन्याय ते समजून घेतील आणि आमच्या आंदोलनाला सहकार्य करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उद्या सकाळपासून पुण्या – मुंबईला जाणारा दूध पुरवठा रोखण्याची तयारी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यामध्ये सचिन तोडकर यांच्यासोबत दिलीप पाटील,स्वप्निल पार्टी राजेंद्र चव्हाण, शैलेश जाधव, नितीन देसाई, राजेंद्र मुदगे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.टप्प्याटप्प्याने हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.