पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना टोलचा झटका

पेट्रोल डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढतच असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत असे असताना आता राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कार व हलक्या वाहनांच्या  टोलदरात ५रुपये व ट्रक,बस साठी २५ रुपये दरवाढ लागु केली आहे.

    कोल्हापूर: सतत पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरवाढी  पाठोपाठ आता पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना टोलचा झटका आता बसणार आहे. किणी ( ता हातकणंगले)आणि तासवडे(सातारा) येथील टोल नाक्यावर १ जुलैच्या मध्यरात्रीपासून ५ ते २५ रुपये दरवाढ लागू करण्यात येणार आहे.
    देशातील प्रमुख चार महानगरांना जोडणाऱ्या महामार्गापैकी पुणे -बंगलोर महामार्ग हा एक आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कल्पणेतून सुवर्ण चौरस  योजनेचे काम सुरू करण्यात आले, बांधा वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर कागल ते शेंद्रे (सातारा)१३३ किलोमीटर महामार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने केले, २००५ साली  महामार्गाचे चौपदरीकरण अपूर्ण असतानाही राज्य रस्ते विकास महामंडळाने  किणी व तासवडे येथे टोल नाके उभा करून टोल वसुली सुरू केली, यावेळी लोकांच्यातून मोठा विरोधही झाला पण तरीही तोल आकारणी सुरूच झाली. आतापर्यंत तब्बल १३ वेळा टोल दरवाढ करण्यात आली आहे, स्थानिक वाहनधारकांचे व महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असतानाही पुन्हा टोल दरवाढ लागु करण्यात येणार असून  कार, जीप अशा हलक्या वाहनांसाठी ७५ रुपये ऐवजी ८० रूपये, हलक्या मालवाहतूक वाहनांना १३५ रुपये ऐवजी १६० तर ट्रक, बस ,अवजड  वाहनांना२६५ ऐवजी २९०रुपये इतका टोल भरावा लागणार आहे.
    पेट्रोल डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढतच असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत असे असताना आता राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कार व हलक्या वाहनांच्या  टोलदरात ५रुपये व ट्रक,बस साठी २५ रुपये दरवाढ लागु केली आहे. १ जुलै (गुरुवार)च्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात वाहन धारकांच्या खिशाला आता चाट बसणार आहे.