राहुल रेखावर कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी

    कोल्हापूर : कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली झाली असून, कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून राहुल रेखावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    अकोला येथील राज्य बीज उत्पादकचे संचालक म्हणून काम पाहणारे राहुल रेखावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून दौलत देसाई यांची नियुक्ती झाली आहे.