प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

    कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी छापा टाकून ८ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम ४,१०० रुपये, दुचाकी, मोबाईल संच असा एकूण २,३५,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
    शिरढोण येथील मसोबा रस्त्यावरील आप्पासो आण्‍णासो पुजारी यांच्या घराच्या आडोश्याला झाडाखाली उघड्यावर पैसे लावून तीन पानी जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांना मिळाली होती. उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर खाडे, संजीव मुंढे, अमित प्रधान यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
    पथकाने या ठिकाणी धाड टाकली असता आप्पासो आण्‍णासो पुजारी, महेश भीमगोंडा हवगुंडे, वसंत अण्णाप्पा यादव, सलीम इसाक मुजावर, सुकुमार आण्णाप्पा पुजारी, फिरोज बादशहा अपराध, विनोद विष्णू बागडी, आकाश काशीनाथ शिंदे (सर्व.रा.शिरढोण) जुगार खेळताना हे ८ जण रंगेहाथ मिळून आले. त्यांच्याकडून ६ दुचाकी, ७ मोबाइल, ४,१०० रुपये रोख रक्कम असा २,३५,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी आरोपींविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे.