मटका अड्डयावर छापा ;  ११  जणांना अटक

अवैध मटका चालविणारा विजय पाटील याचेवर सुमारे १६० गुन्हे दाखल आहेत. मोबाईलवरुन हा मटका-जुगार खेळला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत.

    कोल्हापूर : मटका, जुगार व्यवसायात कार्यरत  असलेल्या विजय पाटील याच्या कांडगाव (ता. करवीर) येथील अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार व दारु अड्डयावर कोल्हापूर पोलीसांनी छापा टाकून ११ जणांना अटक केली. त्यांचेकडील सुमारे ३ लाख ८ हजार ९११ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
    अवैध मटका चालविणारा विजय पाटील याचेवर सुमारे १६० गुन्हे दाखल आहेत. मोबाईलवरुन हा मटका-जुगार खेळला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत.
    कोल्हापूर-राधानगरी रोडवरील कांडगाव गावचे हद्दीतील उत्सव हॉटेल लगत जुगार व दारु विक्री सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना खबऱ्याकडून मिळाली होती . त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाला पाठवून खात्री केली असता येथील एका बंदीस्त पत्र्याच्या शेडचे खोलीमध्ये छापा टाकलल्यावर ११ लोक जुगार खेळताना मिळून आले. विजय लहु पाटील (वय ५०), पांडूरंग दत्तात्रय चव्हाण (६२), सागर मारुती घोटणे (३९), अमित आनंदराव लोखंडे (२८), अमित अतुल भट (३५), उदय हिंदुराव चव्हाण ४२, सर्व रा. कांडगाव, ता. करवीर), दत्तात्रय बापू पाटील (४५), विजय बळवंत पाटील (३५), अनिल नंदकुमार लोखंडे (१९), शहाजी बाळासाहेब पाटील (४३, सर्व रा. देवाळे, ता. करवीर), युवराज बाळू पाटील (४२, रा. वाशी) अशी त्यांची नावे आहेत.
    या सर्वांकडे बुकी मालकासंदर्भात चौकशी केली असता विजय लहु पाटील असल्याचे सांगितले. संशयित अमित भट हा त्याच ठिकाणी दारु विक्री करीत असताना मिळून आला. रोख रक्कम ४० हजार ९७०, देशी, विदेशी दारु, ११ मोबाईल, चार मोटारसायकली, एक जिप्सी गाडी असा सुमारे ३ लाख ८ हजार ९११ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, उपनिरीक्षक विनायक सपाटे यांनी केली.