कोल्हापुरात पावसाचे थैमान सुरुच; एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल

    कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजेपर्यंत पंचगंगेच्या पाणीपातळी 35 फूट 7 इंच इतकी झाली असून, तिची वाटचाल इशारा पातळीकडे होत आहे.

    पावसाचा जोर असाच राहिल्यास दुपारपर्यत इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या दोन तुकड्या पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना झाल्या आहेत. त्यापैकी एक टीम कोल्हापूर शहरात तर दुसरी शिरोळमध्ये तैनात राहणार आहे.