gokul dudh sangh election

निवडणुकीच्या तोंडावर कोणताही गाफीलपणा होऊ नये म्हणून आम्ही सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आणि एकत्र आलो आहोत.गोकुळचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही मोठ्या ताकतीने ही निवडणूक (gokul election)लढवत आहोत, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(minister hasan mushrif) यांनी म्हटले आहे.

  कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात ‘गोकुळ’ च्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा नुकतीच करण्यात आली.पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि आमदार विनय कोरे या दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन सत्ताधारी महादेवराव महाडिक आणि पी.एन.पाटील यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी व्यूहरचना करून जिल्ह्यातील विविध नेत्यांना एकत्र करून या आघाडीची मोट बांधली आहे.

  आज कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात याबाबत पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी उतरणार आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि इतर पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर सर्वजण एकत्र येऊन
  आम्ही ही निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.चंदगडचे आमदार राजेश पाटील, भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर हेदेखील आमच्यासोबत आहेत, असे त्यांनी सांगितले.

  कोल्हापूर म्हणजे दूध पंढरी आहे.शेतीपूरक जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करणारा शेतकरी समाधानी व्हायला पाहिजे, दूध उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये ज्यादा दर कसा देता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू असेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविण्यात यावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. तसेच सत्ताधारी गटाचे नेते आ. पी. एन. पाटील यांच्याशी आमची चर्चा सुरू होती. पण आम्हाला त्यामध्ये यश आले नाही. निवडणुकीच्या तोंडावर कोणताही गाफीलपणा होऊ नये म्हणून आम्ही सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आणि एकत्र आलो आहोत.गोकुळचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही मोठ्या ताकतीने ही निवडणूक लढवत आहोत, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

  तसेच उपस्थित आमदार विनय कोरे यांनी मागच्या वेळी दोन जागा निवडून आल्या होत्या. आता याच संघर्षाने मोठे स्वरूप धारण केलेले आहे. आज संपूर्ण पॅनेल तयार करून निवडणूक लढवली जाणार आहे. महाविकास आघाडी म्हणून जरी लढत असलो तरी या निवडणुकीत पूर्ण महाविकास आघाडी म्हणता येणार नाही. या निवडणुकीत मी भाजपचा घटक पक्ष म्हणून काम करणार आहे.असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

  पत्रकार परिषदेला माजी आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके जनसुराज्यचे प्रवक्ते विजयसिंह जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, विद्यमान संचालक अरुणकुमार डोंगळे, माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वास पाटील,जयश्री पाटील,माजी आमदार के.पी. पाटील उपस्थित होते.