राजू शेट्टी आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत?  सरकारविरोधात रणशिंग

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असला तरी संघटना नेहमीच सामान्य जनतेसोबत राहिली आहे. वेळ पडली तर आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरू, मात्र सरकारचा कोणताही अन्याय सहन करणार नाही. तसेच वाढीव वीज बिलांसंदर्भात लवकरच रस्त्यावरची लढाई सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता.

  कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी याबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत. तसेच स्वाभिमानी स्वतंत्र निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. केंद्रानंतर आघाडी सरकारनेही आम्हाला फसवले, असा आरोप शेट्टी यांनी केला . तत्पूर्वी राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करत आहे.

  या सरकारला पाठिंबा दिल्याचा आपल्याला मोठा पश्चात्ताप होत आहे. आता लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

  वाढीव वीज बिलावरून मतभेद

  स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असला तरी संघटना नेहमीच सामान्य जनतेसोबत राहिली आहे. वेळ पडली तर आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरू, मात्र सरकारचा कोणताही अन्याय सहन करणार नाही. तसेच वाढीव वीज बिलांसंदर्भात लवकरच रस्त्यावरची लढाई सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता.

  एफआरपीच्या मुद्यावरूनही रोष

  राज्यात साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची सुमारे 3 हजार कोटींची एफ आर पी रक्कम थकीत आहे. ही रक्कम देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत. लाॅकडाऊनमध्ये सरकारने भरमसाठ वीज बीलाची आकारणी करून लूट केली. वीज बिल माफ करावे यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी सरकारकडे मागणी केली, परंतु सरकारने दुर्लक्ष केले आहे. जो पर्यत 100 युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ केले जात नाही तो पर्यत सरकार विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही शेट्टींनी दिला.पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मधील दोन उमेदवार साखर कारखानदार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. यांच्याकडे निवडणूक लढवायला पैसे आहेत. पण शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्यासाठी नाहीत हे दुर्दैव आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.