कोल्हापूर नरबळी प्रकरणाला फुटली वाचा; बापानेच घोटला मुलाचा गळा

आरोपी न सापडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. दरम्यान, याप्रकरणी आरवच्या काही नातेवाईक, काही ग्रामस्थ अशा एकूण अकरा संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली होती. पोलिसांची पाच पथकेही वेगवेगळ्या दिशेने तपास करीत होते.

  कोल्हापूर (Kolhapur) : शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथील आरव राकेश केसरे (Aarav Rakesh Kesare) या बेपत्ता झालेल्या बालकाचा मृतदेह आढळल्यानंतर नरबळीची (manslaughter) शक्यता व्यक्त केली जात होती तथापि आपल्याच मुलाचा निर्दयी बापाने गळा घोटून खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. जन्मदाताच चिमुकल्याचा कर्दनकाळ ठरल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी राकेश सर्जेराव केसरे याला पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक वादातून (family dispute) मुलाचा निर्घृण खून (brutally murdered) केल्याची माहितीही पुढे आली आहे.

  3 ऑक्टोबर राजी आरव बेपत्ता झाला होता. त्यानंतर 5 ऑक्टोबर रोजी त्याचा मृतदेह आढळला होता. त्याच्या मृतदेहाशेजारी हळद, कुंकू, गुलाल टाकलेलेही आढळून आले होते.

  नातेवाईकांसह ११ जणांची केली होती चौकशी
  दरम्यान, आरोपी न सापडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. दरम्यान, याप्रकरणी आरवच्या काही नातेवाईक, काही ग्रामस्थ अशा एकूण अकरा संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली होती. पोलिसांची पाच पथकेही वेगवेगळ्या दिशेने तपास करीत होते.

  दिशाभूल करण्याचा प्रयत्न
  दरम्यान, रात्री उशिरा बापानेच आपल्या मुलाचा खून केल्याचे समोर आले. आरवचा खून करून निर्दयी बापाने आपल्याच राहत्या घरापासून शंभर फूट अंतरावर मृतदेह ठेवून त्याच्यावर हळद, कुंकू, गुलाल टाकून नरबळी असल्याची दिशाभूल करण्याचा केलेला प्रयत्नही पोलिस तपासात उघड झाला. चिमुकल्याच्या शोधासाठी पुढे पुढे करणारा बापच खूनी असल्याचा पोलिसांचा संशय अखेर खरा ठरला.