आमदार प्रकाश आबिटकरांची सोशल मिडीयावर बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; भुदरगड तालुका शिवसेनेची मागणी

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले की, आमदार प्रकाश आबिटकर जनतेच्या जीवावर आमदार झाले आहेत. काल माजी आमदार के.पी.पाटील पोरखट पध्दतीने त्यांचेवर टिका करत असतात. जे लोक आमदार साहेबांची सोशल मिडीयावर बदनामी करत आहेत त्यांच्यावर त्वरीत गुन्हे दाखल करावेत. भविष्यात यापध्दतीचे चुकीचे कृत्य जर कोणी केले तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल.

  गारगोटी : मेघोली प्रकल्प फुटीचा राजकीय फायद्यासाठी वापर करून सोशल मिडीयाचा आधार घेत आमदार प्रकाश आबिटकर यांची बदनामी करणाऱ्या समाज कंठकांवर गुन्हे दाखल करा तरच आम्ही स्वस्थ बसू असा इशारा भुदरगड तालुका शिवसेनेच्या वतीने झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर झालेला वाद मिटवण्यासाठी आलेल्या पोलीस पदाधिकऱ्यासमोर दिला.

  तालुक्यातील काही स्वत:ला समाजसेवक समाजणाऱ्या समाजकंठकांनी तालुक्यातील जेष्ठनेत्यांना सोबत घेवून मेघोली धरण फुटीचे राजकारण केले आहे. यावेळी त्यांचेमार्फत आमदार आबिटकर गटाच्या कार्यकर्त्याला मारहानी केलेबद्दल निषेध करण्यासाठी आज शिवसेनेने वतीने निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक, गडहिंग्लज व भुदरगड पोलीस ठाण्यामार्फत मध्यस्थी करून निषेध मोर्चा थांबविला. यावेळी सोशल मिडियावर बदनामीकारक लेखन छापणाऱ्यावर विषय समजून घेवून कारवाई करू असे आश्वासन उपअधिक्षक गणेश इंगळे, पोलीस निरिक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिले.

  यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जून आबिटकर म्हणाले की, ज्या दिवशी हे मेघोली धरण फुटले त्या दिवशी रात्री ११ वा आम्ही कार्यकर्त्यांच्यासोबत तिथे होतो. सारी सरकारी यंत्रणा आमच्यासोबत होती. आंम्ही प्रामाणिकपणे काम करत आलो आहोत. मात्र विरोधकांनी प्रकल्प फुटीचे राजकारण सुरू आहे. सोशल मिडीयावर आमदार साहेबांची बदनामी करणाऱ्यांना पोलीसांनी वेळीच आवर घालावा.

  यावेळी मोर्चा थांबवण्यासाठी भेटीला आलेले पोलीस उपअधिक्षक गणेश इंगळे व पोलीस निरिक्षक प्रकाश गायकवाड यांनी उपस्थीत कार्यकर्त्यांची समजूत घातली. दोन्हीकडचे लोक एकच बोलत आहेत मग हा प्रश्न येतो कुठे? तर यासाठी लोकशाही मुल्ये पाळा. कायदा हाती घेवून जनजीवन विस्कळीत करू नका.लेखी तक्रार त्या सबंधितावर गुंन्हा दाखल केला जाईल असे आश्वासन या दोन पोलीस पदाधिकाऱ्यांवी दिले.

  यावेळी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले की, आमदार प्रकाश आबिटकर जनतेच्या जीवावर आमदार झाले आहेत. काल माजी आमदार के.पी.पाटील पोरखट पध्दतीने त्यांचेवर टिका करत असतात. जे लोक आमदार साहेबांची सोशल मिडीयावर बदनामी करत आहेत त्यांच्यावर त्वरीत गुन्हे दाखल करावेत. भविष्यात यापध्दतीचे चुकीचे कृत्य जर कोणी केले तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल.

  यावेळी राहूरी कृषि विद्यापीठाचे संचालक दत्तात्रय उगले, बाजार समितीचे संचालक कल्याणराव निकम, अंकूश चव्हाण, पं.स.सदस्य सुनिल निंबाळकर, मौनी विद्यापीठाचे संचालक बाजीराव चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, खानापूरचे उपसरपंच राजेंद्र पाटील, प्रविण नलवडे, संग्राम सावंत, ग्रापंचायत सदस्य सर्जेराव मोरे, रणधिर शिंदे, विद्याधर परीट, दिपक देसाई, सजंय चिले, वसंत पाटील, यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.

  पोलीस उपअधिक्षक गणेश इंगळे यांना निवेदन देताना दत्तात्रय उगले, अंकूश चव्हाण, बाजीराव चव्हाण, अविनाश शिंदे, सुनिल निंबाळकर, प्रविण नलवडे आदी.