विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करुन सदाभाऊ खोत यांची आंदोलनाला सुरुवात

  • राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे मुके, बहिरे व आंधळे आहे. अशा सरकारला बा विठ्ठला, सु बुद्धी दे, असे साकडे रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी विठ्ठलाला घातले आहे. तसेच गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३० रुपये मिळु दे आणि सरकारकडून प्रतिलिटर दुधाला १० रुपये अनुदान देण्यात यावे अशा माण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे.

कोल्हापूर – दुध उत्पादकांच्या विविध मागण्यासांठी आज राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुग्धाभिषेक करुन दुध उत्पादकांनी तीव्र आंदोलनाला सुरुवात केले आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह आंदोलनाला सुरुवात केले. या आंदोलनाला शनिवारी १ ऑगस्ट सकाळी सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात संत नामदेव पायरीला विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करुन आंदोलानाची सुरुवात केली. राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे मुके, बहिरे व आंधळे आहे. अशा सरकारला बा विठ्ठला, सु बुद्धी दे, असे साकडे रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी विठ्ठलाला घातले आहे. तसेच गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३० रुपये मिळु दे आणि सरकारकडून प्रतिलिटर दुधाला १० रुपये अनुदान देण्यात यावे अशा माण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी सदाभाऊ खोत यांनी कार्यकर्त्यांसोबत घोषणाबाजी केली होती. 

रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यातील सर्व शेतकरी आज सरकारविऱोधात रस्त्यावर उतरले आहेत. तसेच या आंदोलनात ४६ लाख शेतकरी आंदोलनात सहभागी असल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यात येत होते. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासुन हे अनुदान बंद करण्यात आले आहे. तसेच दुधाच्या दरातही कपात केली आहे. कोरोना काळात दुधाची मागणी घटल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. ह्या सरकारला शेतखऱ्यांच्या प्रश्नांचा काही पडले नाही. सरकारने कोरोना काळात १० लाख टन दुध खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच प्रतिलिटर अनुदान देण्याची ग्वाही दिली होती. परंतु प्रत्यक्षात हि योजना दुध संघाना लागू करण्यात आली आहे.  दुध उत्पादक शेतकऱ्यांनमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तीन पक्षाचे सरकार हे मुकं, बधीर आणि आंधळे असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. तसेच सरकारविरोधात या प्रकरणी आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही ते म्हणाले. 

भाजपनेते  दुध आंदोलना करत आहेत याविरोधात स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजपच्या या आंदोलनाचा निषेध केला आहे. राजू शेट्टी य़ांनी म्हटले आहे की, भाजपचे दुध आंदोलन हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. कारण ठोस उपाय योजना करण्याचे काम हे केंद्र सरकारचे आहे. केंद्राने आयात थांबवली पाहिजे तसेच निर्यातीवर सबसिडी देऊन जीएसटी मागे घेतला पाहिजे. तर दुध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.