
रुग्णाला Expiry Date संपलेले सलाईन लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर मधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात घडला आहे. यामुळे सरकारी रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
कोल्हापूर : रुग्णाला Expiry Date संपलेले सलाईन लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर मधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात घडला आहे. यामुळे सरकारी रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
पेठ वडगाव येथे राहणाऱ्या महादेव खंदारे यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान त्यांना वैधता संपलेले सलाईन लावण्यात आल्याचे त्यांच्या मुलाच्या निदर्शानास आले.
रुग्णालय प्रशासनाच्या या अक्षम्य चूकीबाबत रुग्णाच्या मुलाने जिल्हा शल्य चिकित्सकाकडे तक्रार केली आहे. तसेच संबधितांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.