कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून सात दिवस लॉकडाऊन ; पालकमंत्र्यांनी घेतला निर्णय

कोल्हापूर : गेल्या 15  दिवसांत कोल्हापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग जोमाने वाढत वाढला आहे.याच पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यात सोमवारपासून सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यासंदर्भात घोषणा केली. 

सात दिवसाच्या या लॉकडावून बाबत मार्गदर्शक सुचना,नियम आणि अटी शनिवारी (ता. 18)  जाहीर करण्यात येणार आहेत. लॉक डाऊनच्या काळात दूध वितरण आणि  औषध विक्री वगळता कोणतेही अन्य व्यवसाय सुरू रहाणार नाहीत, असा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या वाढत्या समूह संसर्गाला रोखण्याच्या आणि कोरोना मूळे होणाऱ्या मृत्यू च्या संख्येवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होणार अशी गेल्या काही दिवसांपासून दररोज चर्चा सुरू होती.

आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी संवाद साधला. यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने आदि सहभागी झाले होते. या बैठकीतही बहुंताशी लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन करण्याच्या सुचना दिल्या तर काही लोकप्रतिनिधींनी पूर्ण लॉकडाऊन न करता नियम व अटी घालून हलके लॉक डाऊन करावा असे सूचित केले होते. त्यामूळे हा निर्णय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत न घेता पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना याबाबत अधिकार देण्याचे एकमताने ठरवण्यात आले. त्यानुसार सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवार पासून अलग सात दिवस लॉकडाऊन करण्यात येईल असे जाहीर केले।