मराठा आरक्षणासाठी शाहू महाराजांनी राज्यातील खासदारांना दिला ”हा” महत्वाचा सल्ला

मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत नेला पाहिजे असं मत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी त्यांच्यासमोर विषय मांडला आहे. पंतप्रधान सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलं असलं तर अद्याप त्यांचे विचार काय आहेत हे कळालेलं नाही. ते स्पष्ट झालं तर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात येईल. बहुमत असल्याने त्यांच्याकडे जाऊन सोबत येण्यासाठी विनंती केली पाहिजे,” असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

    कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत नेला पाहिजे असं मत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे. केंद्राने हा विषय मनावर घेतला आणि आपल्या बाजूने मांडायचं ठरवलं तरच हा प्रश्न सुटू शकतो असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे, अजित पवार मोदींनी सकारात्मकता दाखवली असल्याचं म्हटलं असलं तरी अद्यापही त्यांचे काय विचार आहेत समजलेलं नाही असं यावेळी त्यांनी म्हटलं.

    दरम्यान मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात झाली आहे. यावेळी ते बोलत होते. हा विषय पंतप्रधानांपर्यंत नेला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांनी त्यांच्यासमोर विषय मांडला आहे. पंतप्रधान सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलं असलं तर अद्याप त्यांचे विचार काय आहेत हे कळालेलं नाही. ते स्पष्ट झालं तर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात येईल. बहुमत असल्याने त्यांच्याकडे जाऊन सोबत येण्यासाठी विनंती केली पाहिजे,” असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

    तसेचं “केंद्राने हा विषय मनावर घेतला आणि आपल्या बाजूने मांडायचं ठरवलं तरच हा प्रश्न सुटू शकतो,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. कायद्यात आतापर्यंत इतके बदल झाले असताना आणखी एक बदल करण्यास काय अडचण आहे ? अशी विचारणा करताना मनात आणलं तर सगळं होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं. “महाराष्ट्राने एकत्र येऊन आमदार, खासदारांनी हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तो कसा न्यायचा यावर विचार केला पाहिजे. संभाजीराजेंना दिल्लीत पोहोचवण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. एकट्यावरच जबाबदारी टाकणं आणि त्याने सर्व करणं अशक्य आहे. त्यामुळे खासदार आणि मंत्रीमंडळाने दिल्लीत विषय पोहोचवला पाहिजे. तसंच फक्त मोदींकडे विषय मांडून चालणार नाही. पंतप्रधान म्हणतील मी काय करु, बाकीच्यांचं मत काय माहिती नाही, असं चालणार नाही. बहुमतासाठी लॉबिंग करावं लागेल,” असंही ते म्हणाले आहेत.