शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण

शिवसेना खासदार प्राध्यापक संजय सदाशिव मंडलिक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचे कळते. अर्ध्या तासापूर्वी त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर माझी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती.

 कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार प्राध्यापक संजय सदाशिव मंडलिक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचे कळते. अर्ध्या तासापूर्वी त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर माझी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती.

काल रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे काळजी करू नये, पण माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती दरम्यानच्या काळात आपल्या कामाकरिता माझ्या कार्यालयीन क्रमांक ९९ २२ ९९ ८० ९९ या वर संपर्क साधावा. खासदार प्रा.संजय मंडलिक असे लिहून आपल्या मतदारांना व कार्यकर्त्यांना कळवले आहे. गणेशोत्सवाच्या काळातच लोकप्रतिनिधींना कोरनाची लागण होत असल्याने गणेश कार्यकर्ते व नागरीक सुद्धा संभ्रमात पडले आहेत.