कोल्हापूर जिल्ह्यातील ६९६ कोरोना रुग्णांपैकी ५९४ जणांना मिळाला आजपर्यंत डिस्चार्ज

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभरात ६९६ रूग्णांपैकी ५९४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रात्री ८ वाजेपर्यंत ३५ प्राप्त अहवालापैकी १अहवाल निगेटिव्ह, २९ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. तर ५ अहवाल

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभरात ६९६ रूग्णांपैकी ५९४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रात्री ८ वाजेपर्यंत ३५ प्राप्त अहवालापैकी १अहवाल निगेटिव्ह, २९ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. तर ५ अहवाल नाकारण्यात आले. आज अखेर जिल्ह्यात एकूण ९४ पॉझीटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.आज रात्री ८ वाजेपर्यत प्राप्त १ पॉझीटिव्ह अहवालामध्ये हातकणंगले तालुक्यातील १ आहे.

आजची तालुका, नगर पालिका आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- ७४, भुदरगड- ७०, चंदगड- ७४, गडहिंग्लज- ८०, गगनबावडा- ६, हातकणंगले- ८, कागल- ५७, करवीर- १४, पन्हाळा- २५, राधानगरी- ६३, शाहुवाडी- १७५, शिरोळ- ७, नगरपरिषद क्षेत्र- ११, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२४ असे एकूण ६८८ आणि पुणे -१, सोलापूर-३, मुंबई-१, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-१ असे इतर जिल्हा व राज्यातील ८ असे मिळून एकूण ६९६ रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे.जिल्ह्यातील एकूण ६९६ रूग्णांपैकी ५९४ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ८ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ९४ इतकी आहे.