प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रवाशांची कर्नाटक सीमेवर प्रवेशबंदी केली जात आहे. प्रवेशासाठी कर्नाटक सरकारने काही अटी घातल्या आहेत. याचा परिणाम एस. टी. वाहतुकीवर देखील झाला आहे. एस.टी. प्रवाशांनाही हा नियम लागू केल्याने कोल्हापूर विभागाने कर्नाटकात होणारी एसटी वाहतूक बंद केली आहे.

    कोल्हापूर : कोरोना रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रवाशांची कर्नाटक सीमेवर प्रवेशबंदी केली जात आहे. प्रवेशासाठी कर्नाटक सरकारने काही अटी घातल्या आहेत. याचा परिणाम एस. टी. वाहतुकीवर देखील झाला आहे. एस.टी. प्रवाशांनाही हा नियम लागू केल्याने कोल्हापूर विभागाने कर्नाटकात होणारी एसटी वाहतूक बंद केली आहे.

    कोल्हापुरातून दररोज बेळगाव, हुबळी, सौंदत्ती, बदामी, दांडेली, बंगळूर, सागर, कलबुर्गी आदी कर्नाटकातील शहरांत एसटी बसेसची वाहतुक होते. दररोज धावणार्‍या या ३० बसेसची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

    यासह कर्नाटकातील प्रमुख शहरांतून कोल्हापुरात तसेच रत्नागिरी, पुणे, मुंबई आदी ठिकाणी होणारी कर्नाटक परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूकही बंद करण्यात आली आहे.

    महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक सरकारकडून कडक तपासणी केली जात आहे. ७२ तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह आवाज जवळ असेल तरच कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जात आहे. निगेटीव्ह अहवाल जवळ नसणाऱ्या वाहनधारकांना परत पाठवले जात आहे.