राज्य सरकारनं मराठा समाजासाठी ३००० कोटींचं पॅकेज जाहीर करावं , चंद्रकांत पाटलांचे आवाहन

राज्य सरकारनं मराठा समाजासाठी पॅकेज (Package for Maratha Community) जाहीर करावं अशी मागणीही पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत मांडली. सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द केल्यानंतर संपूर्ण राज्यातील मराठा समाजामध्ये संताप होता.

    कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. तसेच समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती. पण केंद्र सरकारनं (Center) गुरुवारी १०२च्या घटनादुरुस्तीवर फेरविचार याचिका (Reviwe Petition) दाखल केली. त्यामुळं मराठा समाजाला दिलासा मिळाला असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.

    आता राज्य सरकारनं मराठा समाजासाठी पॅकेज (Package for Maratha Community) जाहीर करावं अशी मागणीही पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत मांडली. सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द केल्यानंतर संपूर्ण राज्यातील मराठा समाजामध्ये संताप होता.

    महाराष्ट्र सरकारने यानंतर लगेचच १०२व्या घटना दुरुस्तीवर फेरविचार याचिका दाखल करायला हवी होती. पण राज्यानं ती केली नाही, त्यामुळं केंद्र सरकारनं तातडीनं गुरुवारी ही याचिका दाखल केली. त्यासाठी केंद्राचे आभार चंद्रकांत पाटील यांनी मांडले. मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकार गंभीर असून पूर्ण ताकदीने यासाठी केंद्राकडून प्रयत्न केले जात असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सांगितलं.

    यावेळी, चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारलाही मराठा समाजासाठी काहीतरी करण्याचं आवाहन केलं. केंद्रानं याचिका दाखल केली आहे, पण राज्य सरकारनंही मराठा समाजासाठी ३००० कोटींच पॅकेज जाहीर करावं असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं.