अनिल देशमुख निर्दोष आहेत; सर्व आरोपांवर राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांचे रोखठोक उत्तर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने दिलेल्या प्राथमिक अहवालात क्लीन चीट दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, अनिल देशमुख निर्दोष आहेत. भाजपने मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांना हाताशी धरुन आरोप करुन देशमुख आणि पक्षाला बदनाम करण्याचे कारस्थान केले आहे हे मी सातत्याने सांगत आहे. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी पंधरा दिवसात प्राथमिक अहवाल देण्याचा आदेश सीबीआयला दिला होता. त्यात दोष असतील त्यांच्यावर एफआयआयआर दाखल करावा. पण या गुन्ह्यातील प्राथमिक अहवालात सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिल्याची माहिती आहे.

  कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अनिल देशमुख हे निर्दोष असून या प्रकरणी तक्रार करणारे पोलीस अधिकारी परमवीरसिंग हे खाकी वर्दीतील दरोडाखोर असून यांच्या मुसक्या बांधून गजाआड करावे, अशी मागणी केली आहे.

  देशमुख आणि पक्षाला बदनाम करण्याचे कारस्थान

  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने दिलेल्या प्राथमिक अहवालात क्लीन चीट दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, अनिल देशमुख निर्दोष आहेत. भाजपने मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांना हाताशी धरुन आरोप करुन देशमुख आणि पक्षाला बदनाम करण्याचे कारस्थान केले आहे हे मी सातत्याने सांगत आहे. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी पंधरा दिवसात प्राथमिक अहवाल देण्याचा आदेश सीबीआयला दिला होता. त्यात दोष असतील त्यांच्यावर एफआयआयआर दाखल करावा. पण या गुन्ह्यातील प्राथमिक अहवालात सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिल्याची माहिती आहे.

  एंटिलिया प्रकरणातील मास्टर माईंड शोधा

  मुश्रीफ यांनी देशमुख यांच्याविरोधात कोणताही खंडणीचा पुरावा सापडला नसल्याचा दावा केला आहे. या गुन्ह्यातील आरोपी सचिन वाझे याला परमवीरसिंग यांनीच नोकरीत घेऊन उच्च पदाची नोकरी दिली. परमवीरसिंग स्वत: वाझे यांना घेऊन मंत्री व अधिकाऱ्यांकडे ब्रिफिंगसाठी घेऊन जात होते असा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅंटिलिया बंगल्यासमोर स्फोटके ठेवण्याप्रकरणी परमवीरसिंग दोषी आहेत मी सहा महिने सांगत होतो. एनआयने अॅंटिलिया प्रकरणातील मास्टर माईंड शोधावा. स्फोटके ठेवण्याचा उद्देश काय? या मागे कोण याचा तपास करावा म्हणून गेली सहा महिने मागणी करत आहे पण अजूनही शोध लागलेला नाही, याकडेही मुश्रीफांनी लक्ष वेधले.

  परमवीरसिंग हे खाकी वेषातील दरोडखोर

  सीबीआयने माजी मंत्री देशमुख यांना निर्दोष ठरवत दूध का दूध, पाणी का पाणी असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी तक्रार करणाऱ्या परमवीरसिंग हे खाकी वेषातील दरोडखोर यांच्या मुसक्या बांधण्याचे फार महत्वाचे आहे. अशी प्रतिक्रियाही मुश्रीफांनी दिली आहे.