ऑनलाईन शिक्षण समजत नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, शिक्षणमंत्र्यांचं विद्यार्थ्यांना आवाहन

  • एश्वर्या ऑनलाईन शिक्षण सुरु झाल्यापासून अस्वस्थ आणि नैराश्यात होती. यामुळे तिने गळफास घेऊन आपले आय़ुष्य संपविले आहे. यावर उच्च व तंत्र शिक्षण उदय सामंत यांनी म्हटले आहे की, खचून न जाता विद्यार्थ्यांनी आपले मनोबल वाढविले पाहिजे. आणि आलेल्या कोणत्याही प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.

कोल्हापूर – कोल्हापूरातील महिविद्यालयीन मुलीने ऑनलाईन शिक्षण समजत नसल्यामुळे आत्महत्या केली आहे. कोल्हापुरातील करवीर नगरमध्ये ही विद्यार्थिनी राहत होती. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव एश्वर्या पाटील असं आहे. एश्वर्याला ऑनलाईन शिकवणी समजत नसल्याने राहत्या घरी गळफास घेतला आहे. आणि आपले जीवन संपवले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व विद्यर्थ्यांचे ऑनलाईन द्वारे शिकवणी चालू आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिकवणी समजत नाही आहे. विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत संभ्रमात आहेत. 

एश्वर्या ऑनलाईन शिक्षण सुरु झाल्यापासून अस्वस्थ आणि नैराश्यात होती. यामुळे तिने गळफास घेऊन आपले आय़ुष्य संपविले आहे. यावर उच्च व तंत्र शिक्षण उदय सामंत यांनी म्हटले आहे की, खचून न जाता विद्यार्थ्यांनी आपले मनोबल वाढविले पाहिजे. आणि आलेल्या कोणत्याही प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे. 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी करवीर तालुक्यातील वाशी येथील आत्महत्या ग्रस्त कुटूंबाची भेट घेतली आहे. त्यांचे सात्वन केले आहे. यानंतर उदय सामंत म्हणाले झाला प्रकार हा दुर्दैवी आहे. असा प्रकाराची पुनर्रचना होऊ नये म्हणून महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि विद्यापिठातील संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेऊ. मात्र राज्यातील विद्यार्थ्यांनी कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये त्यांनी खचून न जाता संकटाला सामोरे जावे. कोणताही निर्णय घेण्या अगोदर घरच्यांचा विचार करावा. असे उदय सामंत म्हणाले.