दादा स्वच्छ चारित्र्याचे असतील तर…; राजू शेट्टींनी केली ‘ही’ मागणी

    कोल्हापूर : ईडीच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्या पत्रावरूनच अनेक साखर कारखान्याची चौकशी झाली. दादा स्वच्छ चारित्र्याचे असतील तर त्यांनी उर्वरित इतर ४१ साखर कारखानांची सुद्धा चौकशी लावावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत केली.

    ईडीने राज्यातील काेट्यवधी रुपये किमतीचे ४२ साखर कारखाने कवडी मोल दराने विकून कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकला आहे. पाच वर्षे झोपलेली ईडी आता अचानक कशी जागी झाली ? असा सवाल करत शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर नजर टाकून साखर कारखाने बुडवणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांवर सडकून टीका केली.

    राज्यातील कोट्यवधी रुपये किमतीचे ४२ साखर कारखाने कवडी मोल दराने विकून कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकला आहे. यामध्ये कर्ज देणारे, घेणारे, त्याला मंजुरी देणारे, त्यांचा लिलाव करणारे आणि घेणारेही तेच आहेत. हेच कारखाने शेतकरी, कामगार, वाहतूकदार यांचे लाखों रुपयांची देणी द्यायची बाकी आहेत. ते कवडीमोल दराने विकल्याने ते सर्व बुडाल्याचे दिसून येते. साखर कारखाने विकताना शेतकऱ्यांना लुटण्याचं काम केले आहे.

    सर्वपक्षीय चोरांनी कारखाने विकत घेऊन शेतकऱ्यांच्या दौलतीवर दरोडा टाकल्यासारखे आहे. विक्री झालेल्या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे शेअर्स, ठेवी रक्कम परत द्याव्यात. दादा जर स्वछ चारितत्र्याचे असतील तर त्यांनी उर्वरित ४१ साखर कारखान्यांची चौकशी लावावी. हे कारखाने शेतकऱ्याला परत मिळवून दिल्याशिवाय आपला लढा थांबणार नाही.

    – राजू शेट्टी, माजी ख‌ासदार