mahalaxmi kolhapur

कोल्हापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवामध्ये मंदीर परिसरात नागरीकांनी गर्दी न करता देवस्थान समितीने उपलब्ध करुन दिलेल्या ऑनलाईन अथवा स्थानिक चॅनेलवरुन थेट मंदीरातून प्रसारीत होणाऱ्या अंबाबाई देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.

कोल्हापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवामध्ये मंदीर परिसरात नागरीकांनी गर्दी न करता देवस्थान समितीने उपलब्ध करुन दिलेल्या ऑनलाईन अथवा स्थानिक चॅनेलवरुन थेट मंदीरातून प्रसारीत होणाऱ्या अंबाबाई देवीचे दर्शन घ्यावे, (take online darshan of devi ambabai in this navratri) असे आवाहन कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे..नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने सर्व संबधित अधिकाऱ्यांची बैठक आयुक्त कार्यालय मिटींग हॉल येथे घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करुन यंदाचा नवरात्र उत्सव साध्या पध्दतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसेच न्यायालयाचे आदेशानुसारच नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. शासन नियमावलीप्रमाणे मंडपाचे स्वरुप असावेत, साध्या पध्दतीने हा उत्सव साजरा करतानाच मंडळांनी देवीची मूर्ती २ ते ४ फुटाच्या मर्यादीत असाव्यात. शक्यतो पारंपारिक देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवरी मूर्तीचे पुजन करावे, असे आवाहन केले आहे.

नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने शहर व मंदीर परिसरात स्वच्छता, साफसफाई, प्लॅस्टिक कचरा याबाबत आरोग्य विभागाने विशेष पथके नेमावीत. यंदाच्या उत्सावात गरबा, दांडिया तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये, त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबीरे तसेच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेची जागृतीपर कार्यक्रम आयोजित करावे. महापालिकेच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबाबतही मंडळाने जनजागृतीवर भर द्यावा. मंदीर परिसराला लागून असलेले रस्ते बंदीस्त करावेत. आग प्रतिबंधक उपाययोजनेसाठी मंदीर परिसराचे व बाहेरील दुकानांचे फायर ऑडिट करावे. मंदीर परिसरात अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घ्या अशा सुचना आयुक्तांनी केलेल्या आहेत.

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्यावतीने ३ पथके २४ तास कार्यरत राहतील. मंदीराला संलग्न असलेले रस्ते बंदीस्त करण्यात येत आहेत. मंदीर बंद असलेने बाहेरील परिसरातील दुकानांचे फायर ऑडिट करण्याचे काम सुरु आहे. देवस्थान समिती कर्मचारी व मंदीर परिसरातील दुकानदार यांचे आग प्रतिबंधक उपाययोजनेबाबत दुपारी प्रशिक्षण ठेवलेले आहे. मंदीर परिसरातील मुख्य चौक रिकामे करण्याचे काम सुरु आहे. या परिसरात रस्त्यावर १०  दिवस कोणालाही बसू दिले जाणार नाही. या परिसरातील अतिक्रमण उठाव करण्यासाठी १० दिवस अतिक्रमण पथक तैनात करण्यात आले असलेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी सांगितले.

यावेळी सहा.आयुक्त संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, बाबूराव दबडे, रावसाहेब चव्हाण, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजीत चिले, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, सहा.अभियंता विद्युत चेतन लायकर आदी उपस्थित होते.