आज अश्विन शुध्द प्रतिपदा शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रथम दिवस शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके१९४२ करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे महाशक्ती कुंडलिनी स्वरूपामध्ये अलंकार पूजा  बांधण्यात आली होती सादर पूजा मकरंद मुनीश्वर माधव मुनीश्वर यांनी बांधली.
आज अश्विन शुध्द प्रतिपदा शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रथम दिवस शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके१९४२ करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे महाशक्ती कुंडलिनी स्वरूपामध्ये अलंकार पूजा बांधण्यात आली होती सादर पूजा मकरंद मुनीश्वर माधव मुनीश्वर यांनी बांधली.

कोल्हापूर (Kolhapur). करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात मानाची तोफ धडाडली आणि आई अंबाबाईला मानवंदना दिल्यानंतर आज घटस्थापना करण्यात आली. आज सकाळी ०७.३० वाजल्यापासून कोल्हापूरच्या पुरातन अंबाबाई मंदिरात पुण्यवाचन आणि नांदीश्राद्ध हे दोन्ही विधी पूर्ण करण्यात आले. त्यांनतर तोफेची सलामी दिल्यानंतर अंबाबाई मंदिरात घटस्थापना करण्यात आली. आज 12 वाजता माध्यान्ह अभिषेक झाल्यानंतर देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली. दिवसभर मंदिरात सप्तशती पाठ आणि लक्ष्मी नारायण हृदय पाठ मोठ्या भक्तिभावाने सुरू होते.

कोल्हापूर (Kolhapur). करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात मानाची तोफ धडाडली आणि आई अंबाबाईला मानवंदना दिल्यानंतर आज घटस्थापना करण्यात आली. आज सकाळी ०७.३० वाजल्यापासून कोल्हापूरच्या पुरातन अंबाबाई मंदिरात पुण्यवाचन आणि नांदीश्राद्ध हे दोन्ही विधी पूर्ण करण्यात आले. त्यांनतर तोफेची मानवंदना दिल्यानंतर अंबाबाई मंदिरात घटस्थापना करण्यात आली. आज 12 वाजता माध्यान्ह अभिषेक झाल्यानंतर देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली. दिवसभर मंदिरात सप्तशती पाठ आणि लक्ष्मी नारायण हृदय पाठ मोठ्या भक्तिभावाने सुरू होते.

नवरात्रोत्सव काळात दररोज प्रमाणेच देवीची तीन वेळा अभिषेक आणि पाचवेळा आरती केली जाणार आहे. त्याचबरोबर दररोज रात्री उशिरा देवीची पालखी मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करेल. पंचमी अष्टमी आणि विजया दशमी च्या दिवशी देवीची पालखी भेटी साठी अन्य मंदिरात व दसरा चौकात जाते. दरवर्षी नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक देशभरातून कोल्हापूरच्या आंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरात शुकशुकाट जाणवत आहे. केवळ कुळाचार असणारे श्रीपूजक आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी त्याचबरोबर मंदिर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले कर्मचारीच मंदिरात प्रवेश करू शकतात. नवरात्रोत्सव काळात यंदा मात्र प्रथमच भाविकांमध्ये उत्साह दिसत नाही.