There will be no more autopsy; Home Department Order

सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील गौतम जाधव यांचा मुलगा व पत्नीचा आकस्मिक दुदैवी मृत्यू झाल्याने घटनास्थळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    कागल : कागल तालुक्यातील बाचणी येथील मायलेकरांचा खांबावरील विजेची प्रवाहीत तार तुटून आंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला.गीता गैातम जाधव (वय ३९) आणि मुलगा हर्षवर्धन जाधव (वय १४) अशी मृतांची नावे आहेत. सुदैवाने या घटनेत मृत गिता यांची १० वर्षाची मुलगी बचावली. या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली असून घटनास्थळी पोलिस निरिक्षक दतात्रय नाळे यांच्यासह महावितरणच्या अधिका-यांनी भेट दिली.

    याबाबत अधिक माहिती अशी, गैातम जाधव यांचे बाचणी- व्हनाळी रस्त्याच्या आतल्या बाजूला शेतात घर आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गीता जाधव ह्या मुलगा हर्षवर्धन व मुलगी गैारी यांच्यासह घराजवळील शेतातील विहीरीत धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणे धोवून ऊसाच्या शेतातून घराकडे परत येत असताना मुलगी गैारी पुढे,मध्यभागी मुलगा हर्षवर्धन व सर्वात शेवटी आई असे थोडे अंतर राखून तिघेही चालत होते. दरम्यान विद्युत खांबावरील प्रवाहित विजेची तार तुटून गीता यांच्या आंगावर पडली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा आवाज ऐकून मध्यभागी असणारा हर्षवर्धन तातडीने मागे पळाला आणि कांही समजायच्या आत तोही विद्युत तारेला चिकटला आणि त्याचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना घडेपर्यंत गैारी घरी परतली होती परंतू आई आणि भाऊ अजून का आले नाहीत म्हणून ती पुन्हा त्यांना बघायला गेली यावेळी विजेच्या तारेला चिकटून आई व भाऊ निपचित पडल्याचे तिच्या निदर्शनास आलं यावेळी भितीने तिने आरडाओरडा केला. तिच्या ओरडण्याने शेजारी, शेतातील शेत-यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटना पाहून दुरध्वनीद्वारे संपर्क साधत विद्युत पुरवठा त्वरीत खंडीत करण्यात आला. घटनास्थळी महावितरणच्या कर्मचा-यांनी भेट देवून सदर कुटूंबियास तातडीची आर्थिक मदत केली.

    सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील गौतम जाधव यांचा मुलगा व पत्नीचा आकस्मिक दुदैवी मृत्यू झाल्याने घटनास्थळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    प्रसंगावधानामुळे वाचले मुलीचे प्राण
    हि घटना घडत असताना गैातम जाधव हे घरी वैरण आणून ते ठेवण्याचे काम करत होते.त्यामुळे त्यांना याची जराही कल्पना आली नाही. १० वर्षाची मुलगी गैारी हिने जेवढ्या तातडीने घटना बघून पुढे न जाता आरडाओरडा करून प्रसंगावधान दाखवला त्यामुळेच तिचा जीव वाचल्याची चर्चा घटनास्थळी होती.