कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघात सत्ताधारी अडचणीत ; विरोधी आघाडीचे राखीव गटातील ४ उमेदवार विजयी , सर्वसाधारण  गटातील १६ पैकी १२ जागांवर आघाडीवर

विरोधी आघाडीच्या अंजना रेडेकर यांनी महिला गटात तर अनुसूचित जाती जमाती गटातून माजी आमदार सुजित मिणचेकर,भटक्या विमुक्त जाती जमाती गटात बयाजी शेळके,इतर मागासवर्गीय गटात अमरसिंह पाटील यांनी विजय संपादन केला आहे

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळ दूध संघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचा धुव्वा उडाला असून विरोधी शाहू शेतकरी आघाडीने राखीव गटातील चार जागांवर आधीच विजय मिळवला असून उर्वरित सर्वसाधारण १६ पैकी १२ जागांवर सुद्धा चांगलीच आघाडी घेतल्याने गोकुळ दूध संघात सत्ता परिवर्तन अटळ असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

    विरोधी आघाडीच्या अंजना रेडेकर यांनी महिला गटात तर अनुसूचित जाती जमाती गटातून माजी आमदार सुजित मिणचेकर,भटक्या विमुक्त जाती जमाती गटात बयाजी शेळके,इतर मागासवर्गीय गटात अमरसिंह पाटील यांनी विजय संपादन केला आहे.तर महिला राखीव गटात सत्ताधारी गटाच्या शौमिका महाडिक या विजयी झाल्या आहेत.एकूणच सत्ताधारी शाहू आघाडीला केवळ पाच जागा तर विरोधी आघाडीला १६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे