The pain in the mango grove collapsed; Traffic jam on Ratnagiri-Kolhapur highway

    संगमेश्वर : महाराष्ट्रात पावसाचे धुमशान सुुरु आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात ठिठिकाणी दर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात सकाळी  दरड कोसळली. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. महामार्ग साखरपा पोलीसांच्या अथक प्रयत्नानंतर दरड बाजूला करण्यात आली.

    एकेरी वाहतूक असल्याने अवजड वाहनांची वाहतूक काही काळ बंद होती. परंतु काही काळातच जेसीबी साह्याने दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. यावेळी पोलीस ठाण्याच्या अपर्णा दुधाणे, तानाजी पाटील, प्रशांत नागवेकर यांनी स्थानिकांच्या मदतीने दरड बाजूला करण्यासाठी मेहनत घेतली. त्यानंतर काही काळात रस्ता पूर्वरत झाला.