पंचगंगेचा धोका वाढला ; राधानगरीचे सहा दरवाजे खुले

नदीची पूराची पाणीपातळी काही अंशी कमी झाली असली तरी अद्याप धोका पूर्णपणे टळलेला नाही. पंचगंगा नदीची पाणी पातळी ५४ फूटावर आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले आणि शाहूकालीन  राधानगरी धरण उच्चत्तम पातळीपर्यंत भरले असून, सहा स्वयंचलीत दरवाजे खुले झाले आहेत.

    कोल्हापूर : जिल्ह्यास वरदान ठरलेल्या राधानगरी धरणाच स्वंयचलित सहा दरवाजे खुले झाले असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखीन धोका वाढणार आहे. जिल्ह्यात सलग चार दिवस झालेल्या पावसान शहरासह संपूर्ण जिल्हा जलमय झाला असून अनेकांचे संसार पाण्यात बुडाले आहेत.पाण्याची पातळी सतत वाढत असल्यामुळे नागरिक भितीच्या छायेखाली आहेत.रविवारी सायंकाळपासून पावसाची पुन्हा रिपरिप सुरु झाल्याने पुराची धास्तीआणखीन वाढीस लागली आहे. अद्यापही पंचगंगा नदीचे पाणी धोका पातळीवर आहे. अशातच राधानगरी धरणाचे स्वयंचलित सहा दरवाजे उघडण्यात आले असल्याने त्यातून ७११२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्याला पुराचा विळखा कायम आहे.

    तीन दिवस अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे तर नद्या धोका पातळी पेक्षाही अधिक दिशेने वाहू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.सोमवारी काही अंशी पावसाने उघडीप दिली असली तरी धरण भागात पावसाचा जोर कायम असल्याने महापुराची भीती पुन्हा वाढीस लागली आहे.

    नदीची पूराची पाणीपातळी काही अंशी कमी झाली असली तरी अद्याप धोका पूर्णपणे टळलेला नाही. पंचगंगा नदीची पाणी पातळी ५४ फूटावर आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले आणि शाहूकालीन  राधानगरी धरण उच्चत्तम पातळीपर्यंत भरले असून, सहा स्वयंचलीत दरवाजे खुले झाले आहेत. यातून एकूण ७११२ क्यूसेक विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे. एखादा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला की धरण भरले असे समजले जाते. पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने पातळी वाढली व एका पाठोपाठ सहा दरवाजे खुले झाले.